भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगावसारख्या ग्रामीण भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी परस्पर सहकार्याने सर्वसामान्याचा आर्थिक उत्थान साधण्याच्या उदात्त हेतूने सहकारी संस्था निर्मितीचा विडा उचलला. आणि, आज सहकारात यशस्वीतेची नानाविध क्षितिजे पार करणारी, बचत व काटकसरीचे संस्कार समाजमनात रुजवीत स्वावलंबन व स्वाभिमानाचे जगणे समृद्ध करणारी भाग्यश्री पतसंस्था समस्त समाजमनाच्या आस्थेचा विषय ठरत आहे.

इतिहास

प्रेरणा

"सेवा है यज्ञकुंड समिधासम हम जले!"

श्रद्धेय व्यक्तिमत्व

पदश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, लक्ष्मणराव इनामदार संस्थापक सहकार भारती

आमचे आदर्श

पं.पू.डॉ.केशव बळीराम हेडगेवार, पंडित दीनदयाल उपाध्याय

संस्थेचा हेतू

आर्थिक आणि सामाजिक सेवांचा आधार - “सहकार”

संस्था शुभारंभ

ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी शके १९१५, १८ जून १९९३

‘ध्येय पथ

‘’राजकारण मुक्त सहकार’’

ध्येयपथ आणि लक्ष्य

पतसंस्थेचे स्थापनेपासूनचे एक लक्ष्य म्हणजे आम्ही आमच्या सेवेत कमी पडणार नाही हे सुनिश्चित करणे. सतत चांगल्या सेवेसाठी प्रयत्न करणे, प्रगतीचा आलेख कितीही मोठा झाला तरीही मूळ उद्देशापासून विचलित न होता गरजू लोकांना कर्ज देताना ग्रामीण भागातील बांधवांना प्राधान्य देण्याचे धोरण स्थापनेपासून आहे.


संचालक मंडळ


श्री. किशोर शंकरराव महालक्ष्मे

अध्यक्ष

श्री. गोविंद सुरेशराव बिसेन

उपाध्यक्ष

श्री. संजय हरिराम धारणे

संचालक

श्री.चंदु परसराम लोधे

संचालक

अध्यक्ष मनोगत

प्रिय,

भागधारकवहितचिंतकबंधूभगिनींनो

नमस्कार………

  अलीकडे आधुनिकीकरणामुळे संपूर्ण जग कवेत घेतलेले असतांना तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करीत संकेतस्थळाच्या माध्यमातून संस्थेच्या व्यावसायिक प्रगतीची व उपक्रमाची अद्यावत माहिती सादर करतांना मला अतीव आनंद होत आहे.

  चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.नारायणराव तामशेट्टीवार गुरुजी यांनी संघ स्वयंसेवकाच्या सोबतीने सर्वसामान्याच्या आर्थिक उत्थान व सेवाकार्याच्या माध्यमातून सामाजिक जोपासण्याच्या उदात्त हेतूने स्थापन केलेल्या आपल्या भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्थेने नुकतीच स्थापनेची २७ वर्ष पूर्ण केले.

  समाजातील नानाविध घटकांनी मोठ्या विश्वासाने सोपविलेली गुंतवणूक सुरक्षितच नव्हे, तर सुयोग्य गरजूंना कर्ज वितरण करीत अधिक बळकट केली. यामुळेच संस्थेने विक्रमी व्यवसायासह जिल्हा, राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त केले आहे.

भूतपूर्ववविद्यमानसंचालकमंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्या अपार परिश्रमाने व विन्रम सेवेच्या भरवशावरच संस्थेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. यात आपणा सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतकाचीही स्नेहपूर्ण सोबत विसरणे आम्हाला शक्य नाही. आपणा सर्वांचे आम्हाला भूषणावह वाटणारे हे ऋण कायम लाभावे हीच आमची भावना आहे नव्हे यातच संस्थेची भविष्यातील यशस्वी वाटचाल आहे.

संस्थेच्याचिंतनशीलसंचालक,अधिकारी, कर्मचारी, संकलक वर्गाने कालानुरूप अनेक बदल स्विकारले. संगणकीकरण, कोअर बँकिंग आणि आगामी काळात तंत्रज्ञानाची कास धरण्याची अपरिहार्यता म्हणून आता संस्थेच्या संकेतस्थळाचे प्रयोजन. हे संकेतस्थळ प्रगतीचा, वाटचालीचा आरसा असला तरी आपल्या सहकार्याने व मार्गदर्शक सूचनेने तो अधिक पारदर्शक करण्याचा आमचा प्रयत्न असणारे आहे.

संस्था विकास व सामाजिक दायित्व जोपासण्याच्या कामात प्रेरक ठरेल हा विश्वास मला आहे. संस्थेप्रती आपला स्नेह निरंतर कायम असावा. या अपेक्षेसह संकेतस्थळ मी समस्त भागधारक व हितचिंतकांना समर्पित करीत आहे.

पायाभूत सुविधा

सीबीएस तंत्रज्ञान

संस्था जसजशी वाढत जाते तसतसे त्वरित आणि अचूक ग्राहक सेवेची आवश्यकता देखील वाढते. त्याच वेळी, बर्‍याच सामरिक निर्णयांसाठी व्यवस्थापकीय माहितीचे संग्रहण आणि विश्लेषण आवश्यक असते, ज्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. बँकिंग व्यवस्था आधुनिक तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून आहे आणि त्यामध्ये बदल होत आहेत, या संस्थेने सीबीएस सिस्टमला प्रचंड प्रमाणात स्वीकारले आहे.

कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण

कर्मचारी हा कोणत्याही संस्थेचा महत्वाचा भाग असतो. योग्य प्रशिक्षणाद्वारे त्यांना त्यांच्याकडून अपेक्षित प्रभावी काम मिळू शकते, म्हणून कर्मचाऱ्याची उत्पादकता वाढते, तसेच संस्थेची उत्पादकता वाढते आणि नफा वाढतो. महत्त्वाचे म्हणजे, हे अनपेक्षित दुर्घटना टाळते. याचा अर्थ असा आहे की संस्थेचे जोखीम व्यवस्थापन पद्धतशीर आणि प्रभावीपणे केले जाऊ शकते.